Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 9:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे; दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. (हिग्गायोन सेला)1

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याहवेहची नीतिपूर्ण कृत्ये हीच त्यांची ओळख आहे; दुष्ट स्वतःच्याच हस्तकर्माच्या सापळ्यात अडकले आहेत. सेला

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 9:16
26 Iomraidhean Croise  

आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस.”


त्याची टाच सापळ्यात अडकते; पाश त्याला धरून ठेवतो.


दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील, अग्नी, गंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल.


ज्यांनी मला घेरले आहे त्यांच्या वाचेपासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.


हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत.


तुझ्या न्यायकृत्यांमुळे सीयोन डोंगर आनंद पावो; यहूदाच्या कन्या उल्लासोत.


हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे.


त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल; त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल.


दशतंतुवाद्य, सतार व वीणा ह्यांच्या साथीने, गंभीर स्वराने गाणे चांगले आहे.


फारो नजीक येऊन ठेपला; इस्राएल लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिसरी लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले; तेव्हा त्यांना फार भीती वाटली. ते परमेश्वराचा धावा करू लागले.


परमेश्वराने मिसर्‍यांना आपला प्रबळ हात दाखवला तो इस्राएलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे ह्याच्यावर विश्वास ठेवला.


मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील; ह्या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना ह्यांच्या पराभवाकडून मला गौरव मिळेल, आणि मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.” मग त्याप्रमाणे त्यांनी केले.


आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्राएल लोकांना बाहेर काढीन तेव्हा मिसर्‍यांना कळेल की, मी परमेश्वर आहे.”


मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु नीतिमान संकटातून निभावतो.


तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस.


ह्यामुळे त्यांना परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल : नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.


त्यांपैकी बहुत लोक ठेचा खातील, पडतील व आपटून छिन्नभिन्न होतील, पाशांत अडकून धरले जातील.”


मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्‍या लोकांना, दारयावेश राजाने असे लिहून कळवले की, “तुमचे कल्याण असो!”


तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, “हातापायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचत असत; माझ्या करणीचे फळ देवाने मला दिले आहे. मग ते त्याला यरुशलेमेस घेऊन आले; तेथे तो मृत्यू पावला. यहूदा यरुशलेम व हेब्रोन हस्तगत करतो


आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन; तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan