Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 85:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तू आपल्या लोकांच्या अनीतीची क्षमा केली आहेस, त्यांच्या सर्व पापांवर पांघरूण घातले आहेस. (सेला)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तुम्ही आपल्या लोकांच्या अपराधाची क्षमा केली आणि त्यांच्या पातकावर पांघरूण घातले. सेला

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 85:2
10 Iomraidhean Croise  

“पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गींचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहूदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध;


सीयोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले, तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हांला वाटले.


ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य!


पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असतो, तो नाश करीत नाही; तो आपला कोप वारंवार आवरतो, आपला सगळा संताप भडकू देत नाही.


त्या दिवसांत, त्या काळी, लोक इस्राएलाचे दुष्कर्म शोधतील, पण ते नसणार; यहूदाची पातके शोधतील पण त्यांना ती सापडायची नाहीत; कारण ज्यांना मी वाचवून ठेवीन त्यांना मी क्षमा करीन असे परमेश्वर म्हणतो.


तुझ्यासमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस; तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.


तुझ्या थोर दयेनुसार मिसर देशापासून येथपर्यंत जशी तू ह्या लोकांना क्षमा केलीस तशी ह्या वेळीही त्यांच्या अन्यायाची क्षमा कर असे मी तुला विनवतो.”


आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो.


जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan