Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 85:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 जे उत्तम ते परमेश्वर देईल; आणि आमची भूमी आपले फळ देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 याहवेह उत्तम गोष्टीं आम्हाला प्रदान करणार आहेत, आणि आमची भूमी मुबलक पीक देणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 85:12
18 Iomraidhean Croise  

भूमीने आपला उपज दिला आहे; देव, आमचा देव, आम्हांला आशीर्वाद देवो.


भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो; त्याची कणसे लबानोनासारखी होवोत. नगरोनगरीचे लोक पृथ्वीवरील गवताप्रमाणे विपुल होवोत.


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


आमच्यावर आत्म्याची वृष्टी वरून होईल, तोवर असे होईल, मग अरण्य बाग होईल व बागेस वन गणतील.


हे आकाशा, वरून वृष्टी कर; आभाळ नीतिमत्तेचा पाऊस पाडो; पृथ्वी उकलो, तारण आणि नीतिमत्ता ही प्रफुल्लित होवोत; ती एकत्र उगवोत; मी परमेश्वर ह्याचा उत्पन्नकर्ता आहे.


देश आपला उपज देईल, तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल.


तर नेमलेल्या काळात तुमच्याकरता मी पाऊस पाडीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.


हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?


शांततेचे बीजारोपण होत आहे; द्राक्षी आपले फळ देईल, भूमी आपला उपज देईल आणि आकाश आपले दहिवर देईल. ह्या अवशिष्ट लोकांना मी ह्या अवघ्यांचे वतन देईन.


चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.”


काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले.


तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.


ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहूद्यांमध्ये आहेत हे तुम्ही पाहतच आहात; ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत.


त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;


प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan