Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 83:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे, ते तुझ्याविरुद्ध कट करतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे, ते तुझ्याविरूद्ध करार करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 एकजूट होऊन एकमताने त्यांनी कट रचला; ते सर्व तुमच्याविरुद्ध संघटित झाले आहेत—

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 83:5
19 Iomraidhean Croise  

पाहा, जे वतन तू आम्हांला दिले आहेस त्यातून आम्हांला घालवून देण्यासाठी ते आले आहेत; असे हे आमची उलटफेड करण्यास आले आहेत.


एकट्या मर्दखयावर हात टाकणे हे त्याला त्याच्या दृष्टीने कमीपणाचे वाटले, कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते; त्यामुळे अहश्वेरोशाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहूदी लोक ह्यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला.


तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्या वेळी त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते;


परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की,


ते आपल्या मनाशी म्हणाले, “आपण ह्यांचा नायनाट करून टाकू;” त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत.


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


‘अरामाची एफ्राइमाशी जूट झाली आहे’ असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वार्‍याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली.


“हे लोक म्हणतात की, ‘परमेश्वराने निवडलेल्या दोन्ही घराण्यांचा त्याग केला नाही काय?’ ह्या त्यांच्या म्हणण्याकडे तू लक्ष दिले ना? ते माझ्या लोकांचा असा धिक्कार करतात की ते त्यांना राष्ट्र समजत नाहीत.


प्रभू परमेश्वर म्हणतो, पलिष्ट्यांनी सूड घेण्याची कृती केली आहे, मनात आकस धरून नाश करण्याच्या बुद्धीने त्यांनी निरंतरच्या वैरभावाने सूड घेतला आहे;


आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुद्ध जमा झाली आहेत, ती म्हणतात, ती भ्रष्ट होवो, आमचे डोळे सीयोनेला पाहून निवोत.”


कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील; तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस?”


ते एकविचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात.


तेव्हा ते श्वापद, ‘पृथ्वीवरील राजे’ व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यास ‘एकत्र झालेली’ मी पाहिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan