Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 83:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण पाहा, तुझे शत्रू दंगल करीत आहेत; तुझ्या द्वेष्ट्यांनी डोके वर काढले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत, आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पाहा तुमचे शत्रू कसे गुरगुरतात, तुमच्या विरोधकांनी आपले डोके वर काढले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 83:2
22 Iomraidhean Croise  

माझ्यावरच्या तुझ्या संतापामुळे व माझ्या कानावर आलेल्या तुझ्या उन्मत्तपणामुळे मी तुझ्या नाकात वेसण व तुझ्या तोंडात लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.


हे माझ्या स्तुतिपात्र देवा, मौन धरू नकोस;


शत्रूंची आरडाओरड, तुझ्याविरुद्ध उठणार्‍यांचा गोंगाट एकसारखा वर तुझ्यापर्यंत पोचत आहे तो विसरू नकोस.


तुझ्या सभागृहात तुझ्या शत्रूंनी हलकल्लोळ मांडला आहे; त्यांनी आपले ध्वज चिन्हांसाठी उभारले आहेत.


परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील, आणि ते सतत धाकात राहतील2


हे परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे; नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे.


अरेरे, बहुत राष्ट्रांचा केवढा हा गलबला! समुद्राच्या गर्जनेसारखा ते गलबला करतात; केवढी ही राष्ट्रांची खळबळ! ती महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात!


तू कोणाची निंदा केलीस? कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केलेस? कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास? कोणावर आपल्या भुवया चढवल्यास? इस्राएलाचा जो पवित्र प्रभू त्याच्यावर?


माझ्यावरल्या तुझ्या संतापामुळे व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे मी तुझ्या नाकात माझी वेसण व तुझ्या तोंडात माझा लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.’


ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या [नीतिमान] मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.”


तेव्हा लोक त्यांच्यावर उठले; आणि अधिकार्‍यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली.


परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी हेव्याने आपणांबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली.


तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली; आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले; आणि लगेच दरवाजे बंद करण्यात आले.


ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, “जगातून ह्याला नाहीसे करा, ह्याची जगण्याची लायकी नाही.”


असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.


अशा प्रकारे मिद्यान इस्राएल लोकांचा अंकित झाला. त्याने पुन्हा आपले डोके वर काढले नाही. गिदोनाच्या हयातीत म्हणजे चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan