Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 83:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 हे माझ्या देवा, वावटळीच्या धुरळ्यासारखे, वार्‍याने उडवलेल्या भुसासारखे त्यांना कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत, वार्‍याने उडणार्‍या भुशागत त्यांना करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 83:13
15 Iomraidhean Croise  

इकडून तिकडे उडणार्‍या पानांचा तू पिच्छा पुरवतोस काय? शुष्क भुसाच्या पाठीस लागतोस काय?


वार्‍याने जसे धसकट उडते, तुफानाने जसे भूस उडते, तसे ते नष्ट झाले, असे कितीदा घडते?


माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस.


ते वार्‍याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो.


हे देवा, तूच माझा राजा आहेस; याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर.


आपल्याविरुद्ध बंड करणार्‍यांना तू आपल्या महाप्रतापाने उलथून टाकतोस; तू आपला संताप भडकवतोस, तो त्यांना भुसाप्रमाणे भस्म करतो.


त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो म्हणजे ते सुकून जातात, वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते.


ज्याच्या पावलांना नीतिमत्ता अनुसरते, अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली? राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करतो; राजांवर त्याची सत्ता बसवतो, तो त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या स्वाधीन करतो, व उडणार्‍या धसकटाप्रमाणे त्यांना त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करतो.


ह्यास्तव रानातल्या वार्‍यापुढे भूस उडते तसे मी त्यांना उडवीन.


‘ही दोन राष्ट्रे, हे दोन देश माझे आहेत, आपण त्यांचा ताबा घेऊ,’ असे तेथे परमेश्वर असता तू म्हणालास,


प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्यासंबंधाने शत्रू म्हणतात, ‘अहा! ही प्राचीन उंच स्थळे आमच्या ताब्यात आली आहेत;’


त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan