Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 83:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ते एन-दोर येथे नष्ट झाले, आणि ते भूमीला खत झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 ज्यांचा विनाश एनदोर येथे झाला, आणि मग ते भूमीवर पडलेल्या शेणासारखे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 83:10
10 Iomraidhean Croise  

ईजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील, ही ईजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही.”’


तीव्र यातना होऊन ती मरतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही व त्यांना कोणी पुरणार नाही; ती भूमीला खत होतील; त्यांचा तलवारीने व दुष्काळाने संहार होईल; त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील.


इस्साखार व आशेर ह्यांच्या प्रांतांत मनश्शेचे गाव होते ते हे बेथ-शान व त्याची उपनगरे, इब्लाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन-दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानख येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे हे तीन परगणे.


परमेश्वराने सीसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना ह्यांचा बाराकासमोर तलवारीने धुव्वा उडवला; तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.


इकडे बाराकाने हरोशेथ-गोयीमापर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीने पडली; त्यातला एकही वाचला नाही.


कीशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जिवा, हिंमत धरून पुढे चाल.


त्यांनी मिद्यानाचे ओरेब व जेब ह्या नावांचे दोन सरदार पकडले; त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर जिवे मारले व जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ जिवे मारले आणि मिद्यानांचा पाठलाग केला; त्यांनी ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देनेपार गिदोनाकडे नेली.


तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एखादी भूतविद्याप्रवीण स्त्री शोधा म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्‍न विचारीन.” त्याचे चाकर त्याला म्हणाले, “पाहा, एन-दोर येथे एक भूतविद्याप्रवीण स्त्री राहत आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan