Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 82:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांना माहिती नाही व कळतही नाही; ते अंधारात इकडेतिकडे फिरतात; पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 “ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 इतर “दैवतां” ना काहीही कळत नाही, काहीही समजत नाही. ते अंधकारात चालतात; पृथ्वीचे सर्व पाये डळमळीत झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 82:5
19 Iomraidhean Croise  

(आपण तर कालचे, आपल्याला काही अनुभव नाही, कारण पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप आहेत;)


आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार?”


सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत.


दुष्कृत्य करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, देवाचे नाव घेत नाहीत.


पृथ्वी व तिच्यावर राहणारे सर्व भेदरून गेले. तरी तिचे स्तंभ मीच स्थापले आहेत. (सेला)


परमेश्वर राज्य करतो; लोक कंपित होवोत; तो करूबांवर अधिष्ठित आहे; पृथ्वी थरथर कापो.


कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला, आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही;


ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात;


दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्यांना कशाची ठेच लागते हे त्यांना कळत नाही.


ज्ञान्याचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात; आणि मूर्ख अंधकारात चालतो; असे असून सर्वांची गती एकच आहे असे माझ्या लक्षात आले.


शिवाय ह्या भूतलावर न्यायाचे स्थान पाहावे तर तेथे दुष्टता आहे; नीतीचे स्थान पाहावे तर तेथे दुराचार आहे.


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


म्हणून न्याय आमच्यापासून दूर राहतो, दोषमुक्तता आम्हांला प्राप्त होत नाही; आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो तर अंधकार; उजेडाची आशा करतो पण आम्ही काळोखात चालू लागतो.


मी म्हणालो, याकोबाच्या प्रमुखांनो, इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हांला नसावी काय?


ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.


निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”


पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो; तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan