Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 81:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले. (सेला)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले; मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले; मेघगर्जनेतून मी तुला उत्तर दिले; मरीबाह येथे मी तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहिली. सेला

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 81:7
16 Iomraidhean Croise  

आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


फारो नजीक येऊन ठेपला; इस्राएल लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिसरी लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले; तेव्हा त्यांना फार भीती वाटली. ते परमेश्वराचा धावा करू लागले.


आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिसरी सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली.


शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला, तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने1 उत्तर देत गेला.


बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला; इकडे इस्राएलवंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहचली.


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्यास्तव असे दिवस येत आहेत की, ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना मिसर देशांतून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही;


त्या झर्‍याचे नाव मरीबा (म्हणजे भांडण) पडले, कारण इस्राएल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले, आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रकट केले.


“अहरोन आता आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल; जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यात त्याचा प्रवेश होणार नाही; कारण तुम्ही मरीबाच्या पाण्याजवळ माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले.


मग लेवीविषयी तो म्हणाला, ‘तुझे थुम्मीम व उरीम तुझ्या भक्ताजवळ राहोत;’ त्याला तू मस्सा येथे पारखले, मरीबाच्या झर्‍याजवळ तू त्याच्याशी झुंजलास;


‘ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan