Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 81:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नवचंद्राच्या समयी आणि पौर्णिमेच्या सणांच्या दिवशी, आमच्या आनंदोत्सवाच्या वेळी कर्णा वाजवा;

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 81:3
23 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “तू आज त्याच्याकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “काही चिंता नाही.”


दाविदाने लेव्यांच्या प्रमुखांना आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्च स्वराने गायन करतील असे तुमच्या भाऊबंदांतले गायक नेमा.


हेमान, आसाफ व एथान ह्या गवयांना पितळेच्या झांजा वाजवून गजर करण्यासाठी नेमले;


शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍या, बनाया व अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे कर्णे वाजवीत; ओबेद-अदोम व यहीया हे कोशाचे द्वारपाळ होते.


त्यांच्याबरोबर हेमान व यदूथून कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून देवाप्रीत्यर्थ गायनवादन करीत; यदूथूनाच्या पुत्रांना द्वारपाळ केले.


आणि बनाया व याहजिएल हे याजक देवाच्या कराराच्या कोशापुढे नित्य कर्णे वाजवत असत.


दावीद व सेनापती ह्यांनी आसाफ, हेमान व यदूथून ह्यांच्या वंशजांपैकी कित्येकांना वीणा, सारंगी व झांजा वाजवून संदेश देण्याची सेवा करावी म्हणून वेगळे केले. सेवेचे हे काम करणार्‍यांची संख्या येणेप्रमाणे :


पाहा, आमच्याबरोबर, आमच्यापुढे देव आहे; तुमच्याविरुद्ध लोकांना इशारा देण्यासाठी त्याचे याजक कर्णे हाती घेऊन असतात. इस्राएल लोकहो, तुम्ही आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याशी लढू नका; तुम्हांला यश यायचे नाही.”


यहूदी लोकांनी मागे वळून पाहिले तर आपल्यापुढे व मागे युद्ध होणार असे त्यांना दिसून आले, तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि याजक कर्णे वाजवू लागले.


पाहा, मी आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधत आहे. ते परमेश्वराला समर्पण करून त्याच्यासमोर सुगंधी द्रव्यांनी युक्त असा धूप जाळावा, नित्य समर्पित भाकर तेथे ठेवावी आणि रोज सकाळी व संध्याकाळी, शब्बाथदिनी व चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वर ह्याने नेमलेल्या पर्वकाळी होमबली अर्पावेत म्हणून ते मी बांधत आहे. इस्राएलाचा हा निरंतरचा विधी होय.


जितके लेवी गाणारे होते, म्हणजे अर्थात आसाफ, हेमान व यदूथून, तितके सगळे आपल्या पुत्रांसह व भाऊबंदांसह सणाची वस्त्रे लेऊन झांजा, सारंग्या व वीणा घेऊन वेदीच्या पूर्व बाजूस उभे राहिले व त्यांच्याबरोबर एकशे वीस याजक कर्णे वाजवत होते.


मोशेच्या आज्ञेस अनुसरून नित्यविधीप्रमाणे शब्बाथवारी, चंद्रदर्शनी आणि बेखमीर भाकरीचा सण, सप्तकांचा सण व मांडवांचा सण ह्या तीन नेमलेल्या वार्षिक सणांत तो होमबली अर्पण करीत असे.


ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत. डफ व वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत.


वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा; दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.


कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा.


बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे; त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे; परमेश्वराने, सण व शब्बाथ ह्यांचा सीयोनेत विसर पाडला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाने राजा व याजक ह्यांचा धिक्कार केला आहे.


शुभसंदेश असणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतावर पाहा! हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड; कारण ह्यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणारजाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.


आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रीत्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो,


प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे अर्पावीत;


जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावास, कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे ह्यांत तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल.


तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan