Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 80:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तू त्यासाठी जागा तयार केलीस आणि त्याने मूळ धरून देश व्यापला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तू त्याकरता जागा तयार केली; त्याने मूळ धरले आणि देश भरून टाकला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुम्ही जमिनीची मशागत केली व ती नांगरली; या वेलीने मूळ धरले व समस्त भूमी व्यापून टाकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 80:9
17 Iomraidhean Croise  

मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन; मी तेथे त्यांना रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत.


यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनार्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.


दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते.


तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी दाविदाला दिली. सर्व धारकरी पुरुष इस्राएलात अकरा लक्ष आणि यहूदात चार लक्ष सत्तर हजार भरले.


त्याने त्यांना परक्या राष्ट्रांचे देश दिले; त्या लोकांच्या श्रमाचे फळ ह्यांच्या हाती आले,


ह्यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती.


“त्या दिवशी द्राक्षांच्या मळ्याविषयी गीत गा.


येणार्‍या दिवसांत याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरतील.


यहूदाच्या घराण्यातील निभावलेला अवशेष पुन्हा खाली मूळ धरील व वर फळ देईल.


तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली, आणि त्यात एक बुरूज बांधला व द्राक्षकुंड खोदले; मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रानद्राक्षे दिली.


तू त्यांना लावले आहेस, त्यांनी मूळ धरले आहे; ते वाढून त्यांना फळे येतात; तू त्यांच्याजवळ त्यांच्या मुखात असतोस पण त्यांच्या अंतर्यामापासून तू दूर असतोस.


मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता अशी लावली, ती तू माझ्यासमोर विजातीय हीन जातीची द्राक्षलता अशी कशी झालीस?


मी तुमच्या आघाडीस गांधीलमाशा पाठवल्या व त्यांनी अमोर्‍यांचे दोन राजे तुमच्यापुढून हाकून दिले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan