Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 80:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तू आम्हांला आमच्या शेजार्‍यांच्या कलहास कारण करतोस; आणि आमचे वैरी आमचा यथेच्छ उपहास करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त करतोस, आणि आमचे शत्रू आपसात आम्हास हसतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तुम्ही आम्हाला शेजार्‍यांच्या निंदेचा विषय केले आहे; ते आपसात आमचा उपहास करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 80:6
11 Iomraidhean Croise  

लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते.


आम्ही आमच्या शेजार्‍यांना निंदास्पद आणि आमच्या सभोवतालच्या लोकांना तुच्छ व हास्यास्पद झालो आहोत.


आता माझा धनी अश्शूरचा राजा ह्याच्याशी पैज लाव; तुला स्वार बसवण्याची ताकद असली तर तुला दोन हजार घोडे देतो.


तू कोणाची निंदा केलीस? कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केलेस? कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास? कोणावर आपल्या भुवया चढवल्यास? इस्राएलाचा जो पवित्र प्रभू त्याच्यावर?


अगे माझ्या आई! हायहाय! सर्व जगाबरोबर झगडा व विवाद करणार्‍या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी वाढीदिढीचा व्यवहार केला नाही व कोणी माझ्याशी केला नाही; तरी सर्व मला शाप देतात.


इस्राएल तुझा हास्यविषय नव्हता का? तो चोरांमध्ये आढळला काय? जेव्हा जेव्हा तू त्याची गोष्ट काढावीस तेव्हा तेव्हा तू आपली मान हलवावीस.


ह्यास्तव इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; आसपासच्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांना लूट व निंदेचा विषय झालेले पर्वत व टेकड्या, नाले व खोरी, उजाड व ओसाड नगरे ह्यांना प्रभू परमेश्वर असे म्हणतो की,


आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व ‘उल्लास करतील’ व एकमेकांना भेटी पाठवतील; कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणार्‍यांना पीडा दिली होती.


ते आनंदाच्या भरात म्हणाले, “शमशोनाला समोर आणा म्हणजे तो आपली करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणवले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबांमध्ये उभे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan