Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 80:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवितोस तो तू लक्ष दे. जो तू करुबांच्यावर बसतोस, आम्हावर प्रकाश पाड.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 इस्राएलाच्या मेंढपाळा, आमचा धावा ऐका, तुम्हीच योसेफाला मेंढरांच्या कळपाप्रमाणे चालविले. करुबांच्या मध्ये विराजमान असलेले, तुमचे तेजस्वी गौरव प्रगट करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 80:1
37 Iomraidhean Croise  

यहूदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्याजवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला; करूबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाचा हा कोश.


हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.


तू मला छळतोस; आपल्या हातच्या घडलेल्या वस्तूस तुच्छ लेखून दुष्टांच्या मसलतीला प्रसन्न होतोस, हे तुला उचित वाटते काय?


माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे.


हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे.


देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे.


सौंदर्याचा केवळ कळस असा जो सीयोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे.


हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नकोस.


हे देवा, तू आमचा त्याग केला आहेस, आमची दाणादाण केली आहेस; तू कोपायमान झाला आहेस; तू आम्हांला पूर्वस्थितीवर आण.


हे देवा, मला वाचव; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडले आहे.


मोशे व अहरोन ह्यांच्या हस्ते तू आपले लोक कळपांप्रमाणे नेले.


पण त्याने आपल्या लोकांना मेंढरांसारखे बाहेर आणून त्यांना कळपाप्रमाणे रानातून नेले.


त्याने योसेफाचा डेरा वर्ज्य केला, एफ्राइमाचा वंश पसंत केला नाही;


हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.


हे देवा, तू आम्हांला परत आण; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.


हे सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.


हे पारिपत्य करणार्‍या देवा, परमेश्वरा, हे पारिपत्य करणार्‍या देवा, तू आपले तेज प्रकट कर.


परमेश्वर राज्य करतो; लोक कंपित होवोत; तो करूबांवर अधिष्ठित आहे; पृथ्वी थरथर कापो.


मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्‍यांना सांभाळून नेईल.


ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे.


मग त्याच्या लोकांना मोशेच्या वेळचे प्राचीन दिवस आठवले; ते म्हणाले, ज्याने त्यांना त्यांच्या कळपांच्या मेंढपाळांसह समुद्रातून बाहेर आणले तो कोठे आहे? ज्याने आपला पवित्रतेचा आत्मा त्यांच्यात घातला तो कोठे आहे?


त्या प्राण्यांचे रूप म्हटले तर अग्नीच्या इंगळासारखे, मशालीसारखे दिसत होते. अग्नी त्या प्राण्यांमधून खेळत होता; तो धगधगीत असून त्यातून विद्युल्लता निघत होती.


परमेश्वराचे तेज करूबांवरून निघून मंदिराच्या उंबरठ्यावर आले होते; मंदिर मेघाने व्यापले होते व अंगण परमेश्वराच्या तेजाच्या प्रभेने भरून गेले होते.


त्यांच्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यांना चारीन; तो कोण तर माझा सेवक दावीद; तो त्यांना चारील; तो त्यांचा मेंढपाळ होईल.


तेव्हा पाहा, इस्राएलाच्या देवाचे वैभव पूर्वेकडून प्रकट झाले; त्याचा शब्द महापुराच्या ध्वनीसारखा होता; व त्याच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशित झाली.


ह्यास्तव आता, हे आमच्या देवा, आपल्या सेवकाच्या प्रार्थना व विनवण्या ऐक; तुझ्या ओसाड पडलेल्या पवित्र-स्थानावर आपला मुखप्रकाश पाड; हे प्रभो, तू आपल्याप्रीत्यर्थ हे कर.


मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो.


तो म्हणाला, “परमेश्वर सीनायहून आला, सेईरावरून आमच्यावर1 उदय पावला; पारान पर्वतावरून तो प्रकटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली.


आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’


कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक1 ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात.


मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हांला गौरवाचा न कोमेजणारा हार2 प्राप्त होईल.


नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे.


तेव्हा लोकांनी शिलो येथे माणसे पाठवून तेथून सेनाधीश परमेश्वर जो करूबारूढ असतो त्याच्या कराराचा कोश आणवला; देवाच्या कराराच्या कोशाबरोबर एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan