Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे! स्वर्गदेखील तुमचे गौरव प्रकट करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 8:1
27 Iomraidhean Croise  

देव ह्या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यांत तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा?


हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.


ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशांच्या वर आहे.


हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहचले आहे; तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे


हे देवा, आकाशांहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीवर होवो.


हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.


देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश आहे, त्याच्यापुढे आनंदोत्सव करा.


हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे!


देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा; याकोबाच्या देवाचा जयजयकार करा.


हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत!


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


त्याची वाणी परम मधुर आहे; तो सर्वस्वी मनोहर आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ, माझा सखा, असा आहे!


हे आमच्या देवा, परमेश्वरा, तुझ्याहून अन्य सत्ताधीशांनी आमच्यावर सत्ता चालवली होती, पण तुझ्याच द्वारे आम्ही तुझे नाम स्तवतो.


देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पारानाच्या पर्वतावरून येत आहे.(सेला) त्याचा प्रकाश आकाश व्यापतो; त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे.


दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार?”


थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!”


जो खाली उतरला होता त्यानेच सर्वकाही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर ‘आरोहण केले.’)


परमेश्वर तुझा देव ह्या प्रतापी व भययोग्य नावाचे भय बाळगण्यासाठी ह्या ग्रंथात जी नियमशास्त्राची वचने लिहिलेली आहेत ती तू काळजीपूर्वक पाळली नाहीस,


इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा,


असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे.


तेव्हा ‘जणू काय’ मोठ्या ‘समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी’ व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला; तो म्हणाला, “‘हालेलूया; कारण’ सर्वसमर्थ आमचा ‘प्रभू’ देव ह्याने ‘राज्य हाती घेतले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan