Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 74:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आमची चिन्हे आमच्या दृष्टीस पडत नाहीत; कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आम्हास देवाकडून कोणतेही चिन्ह मिळाले नाही, कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 परमेश्वराकडून आम्हाला एकही चिन्ह मिळाले नाही; आता कोणताही संदेष्टा उरला नाही, हे असे कधीपर्यंत चालेल हे सांगणारा आमच्यात कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 74:9
11 Iomraidhean Croise  

आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.


तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत; त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत; तिचा राजा व तिचे सरदार नियमशास्त्र नसलेल्या राष्ट्रांत आहेत; तिच्या संदेष्ट्यांनाही परमेश्वरापासून काही दृष्टान्त होत नाही.


आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यांना आपले शब्बाथही दिले; ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यांना पवित्र केले हे त्यांना समजावे.


नाशावर नाश येईल, अवईवर अवई उठेल; ते संदेष्ट्यांना दृष्टान्त पाहायला सांगतील, पण याजकांचे नियमशास्त्रज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल.


ह्यामुळे तुमच्यावर रात्र गुदरून तुम्हांला दृष्टान्त होणार नाही; तुमच्यावर अंधार पडून तुम्हांला भविष्य सांगता येणार नाही; संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल, त्यांचा दिवस काळोख होईल.


द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजीत होतील; ते सर्व आपली दाढी झाकतील कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही.


त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली.


तो त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी झाली असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काही चिन्ह दाखव.


शमुवेल बाळ एलीसमक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते; त्याचे दृष्टान्त वारंवार होत नसत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan