Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 73:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे; जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात; झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 अहंकार त्यांच्या गळ्यातील माळ; हिंसा त्यांची वस्त्रे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 73:6
25 Iomraidhean Croise  

मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली;


ह्या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला बढती देऊन उच्च पदास चढवले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले.


शाप देणे हा त्याचा पेहराव बनला होता, म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या हाडांत तेलासारखे भिनून जावो.


माझे विरोधी अपमानाने व्याप्त होतील. झग्याप्रमाणे ते लज्जा पांघरतील.


कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत.


जुलूम करणार्‍यांशी स्पर्धा करू नकोस. त्याची कोणतीही रीत स्वीकारू नकोस.


कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात,


दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.


अगे माझे भगिनी, माझे वधू, तू माझे मन मोहित केले; तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या लहानशा हाराने माझे मन मोहिले.


बाळ्या, तोडे, जाळ्या,


मवाब लहानपणापासून सुखात आहे. स्थिर राहिल्यामुळे गाळ खाली बसलेल्या द्राक्षारसासारखा तो आहे; त्याला ह्या पात्रातून त्या पात्रात ओतले नाही, तो बंदिवान होऊन गेला नाही, म्हणून त्याची रुची तशीच कायम आहे; त्याच्या वासात काही फरक झालेला नाही.


आम्ही मवाबाचा गर्व ऐकून आहोत, तो अति गर्विष्ठ आहे, त्याचा ताठा, त्याचा अहंकार, त्याचा अभिमान, त्याची उन्मत्तता आम्ही ऐकून आहोत.


मी तुला दागिन्यांनी सजवले, तुझ्या हातांत बांगड्या घातल्या व गळ्यात गळसरी घातली.


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो.


पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


त्याने मागून घेतलेल्या सोन्याच्या कुंडलांचे वजन सोन्याचे एक हजार सातशे शेकेल भरले. ह्यांखेरीज चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांच्या अंगावरली जांभळी वस्त्रे व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील साखळ्या वेगळ्याच होत्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan