Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 73:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 कारण दुष्टांची समृद्धी पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 73:3
14 Iomraidhean Croise  

लुटारूंचे डेरे समृद्ध असतात, जे देवाला चेतवतात ते निर्भय राहतात, ते आपल्या हातालाच आपला देव समजतात.1


हे पाहून सरळ मनाचे लोक चकित होतील; निर्दोष जन भक्तिहीनामुळे क्रुद्ध होतील;


दुष्ट का जिवंत राहतात? ते वयोवृद्ध का होतात? ते समृद्ध का होतात?


तो त्यांना निर्भय राखतो म्हणून ते स्वस्थ असतात; त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते.


त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात; तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात; तो आपल्या सर्व शत्रूंवर फूत्कार टाकतो.


दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; अन्याय करणार्‍यांचा हेवा करू नकोस.


परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस.


पातक्यांचा हेवा करू नकोस तर परमेश्वराचे भय अहर्निश बाळग;


दुर्जनांचा हेवा करू नकोस, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नकोस.


जुलूम करणार्‍यांशी स्पर्धा करू नकोस. त्याची कोणतीही रीत स्वीकारू नकोस.


एखादा नीतिमान मनुष्य नीतीचे र्आचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो; आणि एखादा दुष्ट मनुष्य अनीतीचे आचरण करीत असताही दिर्घायू होतो; हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसांत पाहिले आहे.


हे परमेश्वरा, मी तुझ्याशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील; तरी मी तुझ्याशी असा वाद करतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेइमानी करणार्‍या सर्वांना सुखसमाधान का प्राप्त होते?


आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो; दुराचारी संपन्न झाले आहेत; त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे.”’


“जो आत्मा आपल्या ठायी वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते” हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हांला वाटते काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan