Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 72:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याच्या कारकिर्दित नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्याच्या दिवसात नितिमानाची भरभराट होवो, आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्याच्या कारकिर्दीत सर्व नीतिमानांची भरभराट होवो आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत समृद्धी वाढो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 72:7
24 Iomraidhean Croise  

दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते.


पण आता माझा देव परमेश्वर ह्याने मला चोहीकडे स्वास्थ्य दिले आहे; कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही.


नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.


तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इन्साफ करील; तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील; ह्यापुढे एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही; ते इत:पर युद्धकला शिकणार नाहीत.


ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे.


जो सर्वांत लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.”


त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसर्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.


एफ्राइमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन; युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल.


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”


“ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”


तेव्हा विश्वास धरणार्‍यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्वकाही समाईक होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan