Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 72:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 कापलेल्या गवतावर पडणार्‍या पर्जन्याप्रमाणे, भूमी सिंचन करणार्‍या सरींप्रमाणे तो उतरो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो, तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 कापलेल्या गवतावर पडणार्‍या पावसाप्रमाणे, पृथ्वीला पाणी देणार्‍या सरीप्रमाणे तो होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 72:6
11 Iomraidhean Croise  

सूर्योदयीच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल, पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल.


तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस; तिचे उंचवटे सपाट करतोस; तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस; तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस.


राजाच्या मुखतेजात जीवन आहे; त्याची प्रसन्नता सरत्या पावसाच्या मेघासारखी आहे.


राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे; त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहिवरासारखी आहे.


मी तो उद्ध्वस्त करीन; त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही; त्यात काटेसराटे उगवतील; त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करीन.


चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू; त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्‍चित आहे; तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणार्‍या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल.”


ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेशमार्ग तलवारीने उद्ध्वस्त करतील; अश्शूर आमच्या देशात येईल, आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल, तेव्हा तो पुरुष त्याच्यापासून आमची सुटका करील.


पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan