Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 72:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला, आणि गरीबाला दुसरा कोणी मदतनीस नाही त्यास मदत केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ज्यांचा कोणी सहायक नाही अशा धावा करणार्‍या दुःखितांना तो मुक्त करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 72:12
19 Iomraidhean Croise  

हे ऐकून, जो मनुष्य मला व माझ्या पुत्राला देवाच्या वतनातून नाहीसा करायला पाहत आहे, त्याच्या हातातून महाराज आपल्या दासीचा बचाव करतील.


कारण करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित ह्यांचा मी उद्धार करी.


तो दुःखितांना त्यांच्या दुःखाच्या द्वारे सोडवतो; विपत्तीच्या द्वारे त्यांची कानउघाडणी करतो.


हे परमेश्वरा, तू दीनांचा मनोरथ पूर्ण केला आहेस; त्यांचे मन तू स्थिर करतोस;


त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे; त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.


बंदिवानांचे उसासे ऐकले, ज्यांचे मरण ठरले होते त्यांना सोडवले;


संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकळुतीने आपले गार्‍हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल.


तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणार्‍यांना चिरडून टाको.


नीतिमान गरिबांच्या वादात मन घालतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते.


मग ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलमांचे मी पुन्हा निरीक्षण केले; तेव्हा पाहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही; त्यांच्यावर जुलूम करणार्‍यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.


दीन व दरिद्री पाणी शोधतात पण ते कोठेच नाही; त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; त्यांची विनंती मी परमेश्वर ऐकेन, मी इस्राएलाच्या देव त्यांचा त्याग करणार नाही.


“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, [भग्नहृदयी जनांस बरे करण्यास] त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे;


मग त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.’


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.


ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.


विपन्न, कर्जबाजारी व जिवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले, तो त्यांचा नायक झाला; सुमारे चारशे पुरुष त्याच्याजवळ जमले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan