Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 71:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो; माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस. कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी सदैव जाऊ शकेन असे माझे आश्रयाचे खडक तुम्ही व्हा; तुम्ही माझ्या तारणाची आज्ञा द्या, कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 71:3
17 Iomraidhean Croise  

तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे; मी त्याचा आश्रय धरतो; तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करतो.


परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.


स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.


तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील; मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन.


हे देवा, तूच माझा राजा आहेस; याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर.


तू प्रबळ व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञापिले आहे; हे देवा, तू आमच्यासाठी जे केले आहेस ते दृढ कर.


मी तर त्याला ज्येष्ठ करीन. पृथ्वीवरील राजांत त्याला सर्वश्रेष्ठ करीन.


हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हांला निवासस्थान आहेस.


कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस,


परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो.


तो उच्च स्थानी वास करील, दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही;


वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया ह्यांची निखालस कत्तल करा; पण ज्यांच्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका; माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा.” तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला.


अनादी देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे; त्याने शत्रूला तुझ्यापुढून हाकून दिले व म्हटले, त्याचा नाश कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan