Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 71:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर; माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव; तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तुमच्या नीतिमत्वानुसार मला वाचवा आणि सोडवा; तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा आणि माझे तारण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 71:2
12 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे; तू आपल्या सत्यतेने व न्याय्यत्वाने माझे ऐक.


हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी मला नवजीवन दे; तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटांतून बाहेर काढ.


माझा निवाडा तुझ्यापुढे होवो; तुझे डोळे समदृष्टीने पाहोत.


मी तुझा धावा केला आहे, कारण, हे देवा, तू माझे ऐकतोस; माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक.


हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस; तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर,


माझ्याकडे आपला कान लाव; मला सत्वर सोडव; तू माझा प्रबल दुर्ग हो; माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो.


परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.


हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.


हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.


मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan