Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 70:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जे माझा जीव घेऊ पाहतात, त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; माझ्या यातनेत आनंद मानणारे माघारी फिरोत आणि अपमानित होवोत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 माझा जीव घेऊ पाहणार्‍यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 70:2
13 Iomraidhean Croise  

माझे विरोधी अपमानाने व्याप्त होतील. झग्याप्रमाणे ते लज्जा पांघरतील.


हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्याकडे सत्वर ये; मी तुझा धावा करतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे.


पुष्कळ गोर्‍ह्यांनी मला वेढले आहे; बाशानातील दांडग्या गोर्‍ह्यांनी मला घेरले आहे.


तू माझा जीव तलवारीपासून सोडव; कुत्र्याच्या पंजांतून माझा प्राण सोडव.


माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.


माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो.


जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत.


माझे सर्व वैरी फजीत होतील व फार घाबरतील; ते माघारी फिरतील, एकाएकी लज्जित होतील.


हे देवा, माझ्यापासून दूर असू नकोस; हे माझ्या देवा, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.


माझ्या जिवाला अपाय करणारे लज्जित होऊन नष्ट होवोत; माझे अनिष्ट करू पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप्त होवोत.


ह्यामुळे त्यांना परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल : नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.


पाहा, जे तुझ्यावर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजीत होतील; तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील.


“मीच तो आहे” असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan