Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा नीतिमानाला स्थिर करा— तुम्ही, हे नीतिमान परमेश्वरा, मने व अंतःकरणे पारखणारे परमेश्वर आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 7:9
36 Iomraidhean Croise  

‘ती माझी बहीण आहे’ असे तो म्हणाला नाही काय? तसेच ‘तो माझा भाऊ आहे’ असे तीही म्हणाली नाही काय? मी सात्त्विक मनाने व स्वच्छ हातांनी हे केले आहे.”


तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर, आणि त्याप्रमाणे घडवून आण; आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टांना दुष्ट ठरव आणि ज्याचे कर्म त्याच्या माथी येऊ दे; निर्दोष्यास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला फळ दे.


हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.


दुर्जनाचा बाहू मोडून टाक; दुष्टाचे दुष्कर्म निःशेष होईपर्यंत त्याचा पिच्छा पुरव.


पोरक्यांना व पीडितांना न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यांना आणखी दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस.


परमेश्वर नीतिमानाला कसास लावतो; त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो.


हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस.


तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहेस, तू मला तावूनसुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही; मी मुखाने अतिक्रमण करणार नाही, असा संकल्प मी केला आहे.


कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही.


हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा.


हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, माझा न्यायनिवाडा व माझ्यासाठी वाद करावा म्हणून ऊठ, जागृत हो.


परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो, आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे.


नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली.


हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.


तर देवाने हे शोधून काढले नसते काय? कारण तो मनातील गुप्त गोष्टी जाणतो.


हे देवा, त्यांचे दात त्यांच्याच घशात घाल; हे परमेश्वरा, तरुण सिंहांच्या दाढा पाडून टाक.


परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे;


राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो. जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळणार नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.”


कारण तो आला आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे; तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील.


कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे; तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील.


तथापि हे सत्य न्याय करणार्‍या, अंतर्याम व हृदय पारखणार्‍या, सेनाधीश परमेश्वरा, त्यांचा तू सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे मांडली आहे.


“प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.”


तरी हे नीतिमानांचे सत्त्व पाहणार्‍या, अंतर्याम व हृदय पारखणार्‍या, सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील तो मला पाहू दे; कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे सादर केली आहे.


समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील; पण त्याचा अंत येईल, कोणी त्याला साहाय्य करणार नाही.”


त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.


आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हांला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.


ह्यासाठी की, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्या वेळेस त्याने तुमची अंत:करणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत.


आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.


देवपित्याने पवित्र केलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून :


मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी ‘मने व अंत:करणे ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हा ‘प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.’


पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”


तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील. पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील; कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan