Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडवो, आणि माझा गौरव धुळीस मिळवो. (सेला)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत; माझा जीव मातीत तुडवो आणि माझे गौरव धुळीस मिळवो. सेला

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 7:5
17 Iomraidhean Croise  

मी आपल्या त्वचेवर तरट शिवले आहे. मी आपले शृंग धुळीत लोळवले आहे.


ह्याला देवाच्या ठायी तारण नाही, असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. (सेला)3


आम्ही तुझ्या साहाय्याने आपल्या शत्रूंना उलथून टाकू; आमच्यावर उठणार्‍यांना तुझ्या नावाने पायदळी तुडवू.


मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही; तो नश्वर पशूंसारखा आहे.


देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील.


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


“मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले; माझ्याबरोबर अन्य राष्ट्रांतला कोणी नव्हता; मी त्यांना आपल्या क्रोधाने तुडवले. मी त्यांना आपल्या संतापाने रगडले; त्यांचे रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले; माझ्या सर्व वस्त्रांवर डाग पडले आहेत.


हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्‍यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे.


तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. आपल्या अभिषिक्ताच्या सुटकेसाठी निघाला आहेस; तू दुर्जनांचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करतोस, त्याच्या शिराचे आपटून तुकडे करतोस. (सेला)


वाटेतला चिखल तुडवत युद्धाला निघालेल्या योद्ध्याप्रमाणे ते होतील; ते युद्ध करतील, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे; घोडेस्वार फजीत होतील.


तुम्ही दुष्टांना तुडवाल; कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्यांखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


शिवाय माझ्या पित्या, पाहा, माझ्या हातात आपल्या झग्याचा काठ आहे, आपल्या झग्याचा काठ मी कापून घेतला, पण आपणाला जिवे मारले नाही, ह्यावरून निश्‍चये समजा की माझ्या मनात काही दुष्ट हेतू अथवा पातक नाही, आपला अपराध मी केला नाही, पण आपण माझा जीव घ्यायला एकसारखे टपला आहात.


तू माझ्याशी भलाईने वागलास ह्याचे प्रमाण तू आज दाखवले आहेस, कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले असून तू मला मारून टाकले नाहीस.


पाहा, मला हे ठाऊक आहे की तू खात्रीने राजा होणार आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती कायम राहणार.


Lean sinn:

Sanasan


Sanasan