Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 7:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल; त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्यांच्या दुष्टाईने त्यांनाच शासन होते; त्यांची हिंसा त्यांच्याच डोक्यावर येऊन बसते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 7:16
21 Iomraidhean Croise  

त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील; त्याने तर माझा बाप दावीद ह्याला नकळत आपल्याहून अधिक नीतिमान व भल्या अशा दोन पुरुषांवर म्हणजे इस्राएलाचा मुख्य सेनापती नेराचा पुत्र अबनेर आणि यहूदाचा मुख्य सेनापती येथेरचा पुत्र अमासा ह्यांच्यावर तुटून पडून त्यांना तलवारीने जिवे मारले.


तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खातील.”


तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.


पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला ह्यावरून हामानाने जे कपटकारस्थान यहूदी लोकांविरुद्ध योजले होते ते त्याच्याच माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबांवर टांगण्यात आले.


माझ्या पाहण्यात तर असे आहे की, जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात, ते तशीच कापणी करतात.


दुर्जन आपल्याच जाळ्यात पडोत; मी तर त्यातून साफ निसटून जाईन.


त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो; तो त्यात अचानक नाश पावो.


पाहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत! त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही.


तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही.


हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे माझे अंतःकरण स्थिर आहे; मी गाईन, मी स्तोत्रे गाईन.


परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे; दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. (हिग्गायोन सेला)1


धनाचा लोभ धरणार्‍या सर्वांची गती अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते.


जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.


जो खड्डा खणतो तोच त्यात पडतो; जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो.


शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”


दावीद आणखी म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वरच त्याला मारील अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल अथवा युद्धात त्याचा अंत होईल.


एवढेच नव्हे तर परमेश्वर तुझ्याबरोबर इस्राएल लोकांनाही पलिष्ट्यांच्या हाती देईल; उद्या तू आपल्या पुत्रांसह माझ्याकडे येशील; परमेश्वर इस्राएलाचे सैन्य पलिष्ट्यांच्या हाती देईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan