Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्याविरुद्ध तो आपली तलवार पाजळतो, त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 दुष्टांनी आपले मार्ग बदलले नाहीत, तर परमेश्वर आपली तलवार पाजळतील; आपले धनुष्य वाकवून त्याची दोरी ताणली आहे. मन

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 7:12
15 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”


परमेश्वर न्यायी आहे; दुर्जनांनी आवळलेली बंधने त्याने तोडली.


हे आमच्या उद्धारक देवा, आम्हांला परत आण; आणि आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर.


तू राष्ट्रांना धमकावले आहेस; दुर्जनांचा तू नाश केला आहेस; तू त्यांचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस.


त्या दिवशी परमेश्वर आपल्या दु:खकर, महान व बलवान खड्गाने चपल सर्प लिव्याथान व वक्र सर्प लिव्याथान ह्यांचे पारिपत्य करील; समुद्रातील अजगराला ठार मारील.


कारण माझ्या तलवारीस आकाशात उन्माद चढला आहे; पाहा, शासन करण्यासाठी अदोमावर, ज्या लोकांचा सर्वस्वी नाश करण्याचे मी योजले आहे त्यांच्यावर ती उतरेल.


प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, ह्यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हांला अडथळा होणार नाही.


इस्राएलाच्या दृष्टीने हा शकुन खोटा आहे, कारण त्यांच्याजवळ देवाचे प्रतिज्ञापूर्वक करार आहेत; तरी तो त्यांना त्यांच्या अधर्माचे स्मरण देऊन परक्यांच्या स्वाधीन करतो.


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?


आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.


तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावेत;


मी आपली चमकणारी तलवार पाजळली, मी न्याय हाती घेतला, तर मी आपल्या विरोधकांचा सूड घेईन, माझ्या वैर्‍यांचे उसने फेडीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan