Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 69:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आरोळी मारता मारता मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 अगदी थकून जाईपर्यंत मी मदतीसाठी आक्रोश केला आहे; माझा घसा कोरडा झाला आहे. आपल्या परमेश्वराची वाट पाहत, माझे डोळे थकले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 69:3
18 Iomraidhean Croise  

दुष्टांचे डोळे थकतील; त्यांना कोणतेही शरणस्थान राहणार नाही; प्राण सोडणे एवढीच काय ती त्यांना आशा वाटेल.”


रडून रडून माझे तोंड लाल झाले आहे; माझ्या पापण्यांवर मृत्युच्छाया पडली आहे;


तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत.


तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिणले आहेत; “तू माझे सांत्वन केव्हा करशील” असे मी म्हणत आहे.


माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस.


माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही.


सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे.


तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठायी आहे.


त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले; हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील.


मी कण्हून कण्हून थकलो आहे, रोज रात्री मी आपले अंथरूण आसवांत पोहवतो; मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो.


त्यांनी मला अन्न म्हणून विष खायला दिले, तहान भागवण्यास मला आंब दिली.


तुझ्या संतापाचा भार माझ्यावर पडला आहे, तू आपल्या सर्व लाटांनी मला पिडले आहेस. (सेला)


निळवीप्रमाणे, सारसाप्रमाणे मी चिवचिवलो; पारव्याप्रमाणे मी घुमलो; वर पाहून पाहून माझे डोळे शिणले. हे परमेश्वरा, माझ्यावर गहजब झाला आहे, मला जामीन हो.


माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत, माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत; माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे; कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन पडली आहेत.


ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले.


तुझे मुलगे व तुझ्या मुली परक्या राष्ट्रांच्या हाती लागतील, उत्कट इच्छेने आणि त्यांची वाट पाहता पाहता तुझे डोळे शिणतील, आणि तुझ्या हातात काहीच त्राण उरणार नाही.


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan