Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 66:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा; ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 66:2
17 Iomraidhean Croise  

मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या व पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला देव परमेश्वर ह्याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा : तुझे वैभवशाली नाम धन्य असो; ते सर्व धन्यवाद व स्तवन ह्यांपलीकडे आहे.


परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल? त्याची सर्व स्तुती कोण ऐकवील?


परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत;


ते त्याला उपकारस्मरणरूपी यज्ञ अर्पोत, व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णोत.


पुरातन आकाशांच्या आकाशावर आरूढ होऊन जो स्वारी करतो, त्याची स्तोत्रे गा; पाहा, तो आपला शब्द, सामर्थ्याचा शब्द, उच्चारतो.


परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्ये करतो; त्याचा धन्यवाद होवो.


हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्यासाठी आम्हांला साहाय्य कर; आपल्या नावासाठी आम्हांला सोडव व आमची पातके धुऊन टाक.


ते परमेश्वराचे गौरव करोत, द्वीपद्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करोत.


हे आकाशा जयजयकार कर; हे पृथ्वी, आनंद कर; अहो पर्वतांनो, जयघोष करा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे.


ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1


आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो, आणि त्यांतील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे म्हणताना ऐकले : “राजासनावर बसलेला ह्याला व कोकर्‍याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan