Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 64:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी पाजळली आहे; सात्त्विकाला एकान्तात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे. त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तलवारीप्रमाणे ते आपल्या जिभांना धारदार करतात आणि बाणांप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या कटुशब्दांनी लक्ष्य करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 64:3
9 Iomraidhean Croise  

कारण पाहा, दुर्जन धनुष्य वाकवत आहेत; सरळ मनाच्यांना अंधारात मारण्यासाठी दोरीला तीर लावत आहेत;


त्यांनी माझ्यासाठी मांडलेल्या पाशापासून आणि दुष्कर्म्यांच्या सापळ्यांपासून मला राख.


माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन.


वाहणार्‍या लोंढ्याप्रमाणे ते वाहून जावोत; तो बाण रोखील तेव्हा ते भंग पावल्याप्रमाणे होवोत.


कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.


पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल ह्यांना खाऊन नाहीतसे करावे, असे तलवारींसारखे ज्यांचे दात व सुर्‍यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे.


तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan