Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 61:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 माझे मन व्याकूळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो; जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 दिगंतापासून मी तुमचा धावा करतो माझे हृदय व्याकूळ झाले असताना; तुम्हीच मला उंच खडकावर न्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 61:2
20 Iomraidhean Croise  

माझ्या ठायी माझा आत्मा व्याकूळ झाला आहे; तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे; मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडला आहे.


माझा आत्मा माझ्या ठायी व्याकूळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे.


हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.


परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.


परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझे तारण करणार्‍या देवाचा महिमा वाढो;


कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील.


नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली.


हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे, म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिस्हाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो.


हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपि त्याचे गुणगान गाईन.


भीती व कापरे ही माझ्यावर येऊन गुदरली आहेत; धडकीने मला व्यापले आहे.


तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे; तोच माझा उंच गड आहे; मी सहसा ढळणार नाही.


तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही.


मी देवाचे स्मरण करून व्याकूळ होतो; मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्च्छित होतो. (सेला)


वार्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल.


अगे पिडलेले, वादळांनी त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालीन.


मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता.


पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan