Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 6:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी कण्हून कण्हून थकलो आहे, रोज रात्री मी आपले अंथरूण आसवांत पोहवतो; मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 6:6
23 Iomraidhean Croise  

“माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे; मी आपले गार्‍हाणे एकसारखे चालू ठेवीन; माझ्या जिवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन.


माझे मित्र माझे उपहासक बनले आहेत; पण देवासमोर माझे नेत्र अश्रू ढाळत आहेत.


“अजूनही माझे गार्‍हाणे हटवादाचे आहे; त्याचा प्रहार माझ्या विलापाहून भारी आहे.


त्याप्रमाणे निराशेत महिन्यांचे महिने मला घालायचे आहेत, कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला आहेत.


मेलेले म्हणजे निःशब्दस्थानी उतरलेले कोणीही परमेशाचे स्तवन करीत नाहीत;


हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य कर.”


हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे; माझे कण्हणे तुझ्यापासून गुप्त नाही.


हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या धाव्याकडे कान लाव; माझे अश्रू पाहून उगा राहू नकोस; कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यापुढे परदेशीय व उपरा आहे.


“तुझा देव कोठे आहे?” असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत.


आरोळी मारता मारता मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत.


तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेत होईल काय? विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल काय?


कष्टामुळे माझे डोळे क्षीण झाले आहेत; हे परमेश्वरा, मी दररोज तुझा धावा करतो; तुझ्यापुढे मी आपले हात पसरतो.


अधोलोक तुझा धन्यवाद करीत नाही, मृत्यू तुझी स्तुती गात नाही; शवगर्तेत उतरलेले तुझ्या सत्याची अपेक्षा करीत नाहीत.


तू त्यांना हे वचन सांग, ‘माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत; कारण माझ्या लोकांची कुंवार कन्या भयंकर जखम लागून अति छिन्नभिन्न झाली आहे.


ह्या सर्वांमुळे मी रडत आहे; माझा डोळा, माझा डोळा अश्रू ढाळत आहे; कारण माझ्या जिवाचे समाधान व सांत्वन करणारा मला अंतरला आहे; माझी मुले नष्ट झाली आहेत, कारण शत्रू प्रबल झाला आहे.”


ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.


माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत, माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत; माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे; कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन पडली आहेत.


आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan