Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 माझे सर्व वैरी फजीत होतील व फार घाबरतील; ते माघारी फिरतील, एकाएकी लज्जित होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील; ते मागे फिरतील आणि तत्काळ लज्जित होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 6:10
23 Iomraidhean Croise  

“परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्‍या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.


पुन्हा वाद करा; काही अन्याय होऊ देऊ नका; पुनरपि बोला; माझी नीतिमत्ता पूर्ववत स्थापित होईल.


हे पाहून दुर्जन खिन्न होईल; तो दातओठ खाईल पण विरघळून जाईल; दुर्जनांची इच्छा नष्ट होईल.


मी त्याच्या वैर्‍यांना लज्जेने वेष्टित करीन; पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल.”


पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील.


तुझी कास धरणारा कोणीच फजीत होत नाही! निष्कारण कपट करणारे फजीत होतात.


माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.


हे देवा, त्यांना दोषी ठरव; ते आपल्या मसलतींत फसोत; त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे, कारण ते तुला जुमानत नाहीत;


त्याच्याशी जे मित्रत्वाने राहत होते त्यांच्यावर त्याने आपला हात उगारला; त्याने आपला करार मोडला;1


हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन ऊठ; माझे शत्रू संतापले असता त्यांच्याविरुद्ध उभा राहा; माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस;


माझ्या जिवाला अपाय करणारे लज्जित होऊन नष्ट होवोत; माझे अनिष्ट करू पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप्त होवोत.


माझी जीभही दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील; कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजीत झाले आहेत.


एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे! भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत;


हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, ह्यासाठी की, तू माझे साहाय्य व समाधान केले आहेस, हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जित व्हावे.


पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो, त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत; ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील; विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल.


मग तुम्ही वळाल, आणि नीतिमान व दुष्ट ह्यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा ह्यांच्यातला भेद तुम्हांला कळेल.


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan