Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 59:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्यांच्या तोंडचे पातक, त्यांच्या मुखांतील शब्द, त्यांनी उच्चारलेले शाप व लबाड्या ह्यांमुळे ते आपल्या गर्वात गुरफटून जावोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या ओठांचे शब्द, आणि त्यांनी अभिव्यक्त केलेले शाप आणि खोटेपणा यामुळे ते आपल्या अंहकारात पकडले जातात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्यांच्या मुखाने केलेली पापे, त्यांच्या ओठांचे शब्द आणि त्यांनी दिलेल्या शापांमुळे व लबाड्यांमुळे त्यांना स्वतःच्या अहंकारात अडकू द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 59:12
20 Iomraidhean Croise  

मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु नीतिमान संकटातून निभावतो.


मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो. त्याची वाणी त्याच्या जिवाला पाश होय.


त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत; त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत.


शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.


दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत.


तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत सार्‍या यहूदीयात शिक्षण देऊन लोकांना चिथवले आहे.”


“महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे.


सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.”


ज्या ज्या बाबतीत तू माझ्याविरुद्ध उल्लंघन करावेस त्याविषयी त्या दिवसांत तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही; कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणार्‍यांना तुझ्यातून नाहीतसे करीन; माझ्या पवित्र पर्वतावर तू ह्यापुढे तोरा मिरवणार नाहीस.


सरळांची नीतिमत्ता त्यांना सोडवील, पण जे कपटाने वागतात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होतील.


तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस.


हे प्रभू, आमच्या शेजार्‍यांनी केलेली तुझी निंदा उलट त्यांच्या पदरी सातपटीने घाल.


तो पृथ्वीवरील लोकनायकांची बुद्धी हरण करतो, त्यांना मार्गरहित वैराण प्रदेशात भटकायला लावतो.


माझ्यावर उठणार्‍यांच्या तोंडचे शब्द व दिवसभर चाललेला त्यांचा माझ्याविषयीचा कट तू ऐकला आहेस.


तरी त्यांच्यापैकी थोडक्या लोकांना तलवार, दुष्काळ व मरी ह्यांपासून मी वाचवीन; म्हणजे ते ज्या ज्या राष्ट्रांत जातील तेथे आपल्या अमंगळ कृत्यांची कहाणी सांगतील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan