Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 57:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 माझ्या पायांसाठी त्यांनी जाळे मांडले आहे; माझा जीव गळून गेला आहे; माझ्या वाटेत त्यांनी खाच खणली, तिच्यात ते स्वतःच पडले आहेत. (सेला)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; माझा जीव वाकून गेला आहे; त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 माझ्या पावलांसाठी त्यांनी सापळा लावला आहे— संकटात मी वाकून गेलो होतो. माझ्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला होता— परंतु ते स्वतःच त्यात पडले आहेत. सेला

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 57:6
18 Iomraidhean Croise  

दाविदाने सर्व मंडळीदेखत परमेश्वराचा धन्यवाद केला; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आमचा पिता इस्राएल ह्याच्या देवा, तू सदासर्वकाळ धन्य आहेस.


हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्वरा; राज्यही तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस.


तुझ्या प्रिय जनांनी मुक्त व्हावे म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक.


गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्‍या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात. (सेला)


माझ्या ठायी माझा आत्मा व्याकूळ झाला आहे; तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे; मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडला आहे.


माझा आत्मा माझ्या ठायी व्याकूळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे.


पतन पावणार्‍या सर्वांना परमेश्वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करतो.


हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे, म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिस्हाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो.


तू बाळके व तान्हुली ह्यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे; तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा ह्यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहेस.


जो सरळांना बहकावून कुमार्गाला लावतो तो आपण खणलेल्या खाचेत स्वत: पडेल; पण सात्त्विक कल्याणरूप वतन पावतील.


जो आपल्या शेजार्‍याची खुशामत करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरतो.


भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.


वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan