Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 57:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 हे देवा, आकाशांहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीवर होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 57:5
21 Iomraidhean Croise  

नंतर दावीद राजाने सर्व मंडळीला म्हटले, “माझा पुत्र शलमोन सुकुमार बालक आहे, ह्यालाच देवाने निवडले आहे आणि काम तर मोठे आहे; कारण हे भवन मानवासाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे.


ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशांच्या वर आहे.


हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो; आम्ही गायनवादन करून तुझा पराक्रम वाखाणू.


हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीभर होवो.


परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील; तू सर्व राष्ट्रांचा उपहास करशील.


ते त्याच्यावर अकस्मात मारा करतात; ते भीत नाहीत.


त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन! आमेन!


हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस.


कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.


पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल ह्यांना खाऊन नाहीतसे करावे, असे तलवारींसारखे ज्यांचे दात व सुर्‍यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे.


त्या दिवशी तुम्ही म्हणाल : “परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा; त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा.


त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल; व परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.


त्या दिवशी लोकांचा उन्मत्तपणा भंग पावेल. मनुष्यांचा गर्व उतरेल; आणि परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.


आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातांतून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्ये जाणतील की तूच काय तो परमेश्वर आहेस.”


ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1


कारण जल समुद्राला व्यापून टाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल.


देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पारानाच्या पर्वतावरून येत आहे.(सेला) त्याचा प्रकाश आकाश व्यापतो; त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे.


वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan