Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 57:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तो स्वर्गातून साहाय्य पाठवून मला तारील; कारण माझा पिच्छा पुरवणारा माझा उपहास करीत आहे; (सेला) देव आपली दया व सत्य पाठवून देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ते स्वर्गातून साहाय्य पाठवून माझे तारण करतील; जे माझा पाठलाग करतात त्यांचा ते तिरस्कार करतात; सेला परमेश्वर त्यांची प्रीती आणि विश्वासूपणा पाठवून देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 57:3
14 Iomraidhean Croise  

‘ह्याच्या घरी मांसान्नाने तृप्ती झाली नाही असा एक तरी आढळेल,’ असे माझ्या डेर्‍यातल्या लोकांनी म्हटले नसेल,


परमेश्वर माझ्याविषयी सर्वकाही सिद्धीस नेईल; हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे; तू आपल्या हातचे काम सोडू नकोस.


हे परमेश्वरा, तू माझ्याविषयीचा आपला कळवळा आवरून धरू नकोस; तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत.


तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर; ती मला मार्ग दाखवोत; तुझ्या पवित्र डोंगरावर, तुझ्या निवासस्थानी मला पोहचवोत;


तो देवासमोर चिरकाल राहो; तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करतील असे कर;


हे परमेश्वरा, आमच्यासाठी तू शांतता स्थापीत करशील; कारण तू आमच्यासाठी आमची सर्व कार्ये साधली आहेत.


पाहा, हे राष्ट्र सिंहिणीसारखे उठत आहे. सिंहाप्रमाणे ते उभे राहत आहे; शिकार भक्षण करीपर्यंत, वधलेल्याचे रुधिर प्राशन करीपर्यंत ते बसायचे नाहीत.”


कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले.


मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan