Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 57:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परात्पर देवाचा, माझे सर्वकाही सिद्धीस नेणार्‍या देवाचा मी धावा करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो त्याचा मी धावा करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जे मला निर्दोष ठरवितात, त्या सर्वोच्च परमेश्वराचा मी धावा करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 57:2
12 Iomraidhean Croise  

परमेश्वर माझ्याविषयी सर्वकाही सिद्धीस नेईल; हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे; तू आपल्या हातचे काम सोडू नकोस.


हे परमेश्वरा, माझ्या वैर्‍यांपासून मला मुक्त कर; मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे.


मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव,


माझे वैरी माझ्याविरुद्ध अभद्र बोलून म्हणतात की, “हा केव्हा मरेल आणि ह्याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल?”


दिवसभर माझे शत्रू मला तुडवत आहेत माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत;


हे परमेश्वरा, आमच्यासाठी तू शांतता स्थापीत करशील; कारण तू आमच्यासाठी आमची सर्व कार्ये साधली आहेत.


चला, माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे.


म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या;


तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan