Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 57:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर; माझा जीव तुझा आश्रय करतो; ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे; संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या छायेखाली आश्रय घेईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 57:1
34 Iomraidhean Croise  

ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्‍चल व सर्वकाळ टिकणार्‍या सीयोन डोंगरासारखे आहेत.


मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल.


मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारतो; आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करतो.


पुत्राने2 रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.


हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करते!


हे देवा, माझ्यावर दया कर, कारण माणसे मला तुडवत आहेत; दिवसभर माझ्याशी लढून त्यांनी माझा छळ मांडला आहे.


अहो सत्ताधीशांनो, तुम्ही यथार्थ न्याय करता काय? तुम्ही मनुष्यामनुष्यामध्ये चोख निवाडा करता काय?


हे माझ्या देवा, माझ्या वैर्‍यांपासून मला सोडव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचव.


तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन. (सेला)


कारण तू माझे साहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन.


हे देवा, आम्ही तुझे उपकारस्मरण करतो; तुझे उपकारस्मरण करतो; कारण तुझे नाव समीप आहे; तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करतात.


ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस.


जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.


तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे.


कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस,


कारण थोडक्याच काळाने तुझ्यावरचा माझा कोप शमून माझा क्रोध त्याच्या नाशास प्रवृत्त होईल.


चला, माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.


परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.


आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.


यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.


मी परमेश्वराची अशी प्रार्थना केली की, ‘हे प्रभू परमेश्वरा, ही तुझी प्रजा, हे तुझे वतन तू आपल्या प्रतापाने सोडवलेस आणि पराक्रमी हाताने मिसर देशातून काढून आणलेस त्याचा नाश करू नकोस.


‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”


मी म्हटले, “प्रभो, हे तुला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोकर्‍याच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत.


परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या पंखांखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो.”


दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला; हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली.


वाटेने जाताना तो एका मेंढवाड्याजवळ आला, तेथे एक गुहा होती; तिच्या आत शौल बहिर्दिशेस गेला. गुहेच्या अगदी आतल्या बाजूला दावीद व त्याचे लोक बसले होते.


तेव्हा दाविदाला त्याचे लोक म्हणाले, “परमेश्वराने आपणाला सांगितले होते की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर; हे घडून येण्याचा दिवस हाच आहे.” तेव्हा दाविदाने उठून शौलाच्या झग्याचा काठ हळूच कापून घेतला.


नंतर दावीदही उठून गुहेतून बाहेर पडला आणि त्याने मागून शौलाला हाक मारली, “माझे स्वामीराज!” शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा दाविदाने खाली लवून त्याला मुजरा केला.


दावीद अबीशयास म्हणाला, “त्याचा वध करू नकोस, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan