Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 53:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भेदरले आहेत; कारण तुझ्याविरुद्ध छावणी देऊन बसणार्‍यांची हाडे देवाने विखरली आहेत; तू त्यांची फजिती केली आहेस, कारण देवाने त्यांचा धिक्कार केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 पण पाहा, जिथे भिण्याचे कारण नव्हते, तिथे ते भयाने भरले. परमेश्वराने त्यांची हाडे विखरून टाकली, ज्यांनी तुमच्याविरुद्ध तळ दिला होता; तुम्ही त्यांची फजिती केली, कारण ते परमेश्वराद्वारे लज्जित झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 53:5
22 Iomraidhean Croise  

दहशतीचा शब्द त्याच्या कानात घुमत असतो; भरभराटीच्या काळात विध्वंसक त्याच्यावर चालून येईल.


पाहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकांत वस्ती करतो


जमीन नांगरताना व ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशी आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत.


स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभू त्यांचा उपहास करीत आहे.


माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.


माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो.


जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत.


जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते, तसे हे प्रभू, तू सज्ज होताच त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानशील.


कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.


कारण पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र केले आहे, मानवांमध्ये तुला तुच्छ केले आहे.


त्यांना टाकाऊ रुपे म्हणतील, कारण परमेश्वराने त्यांना टाकले आहे.”


बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे; त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे; परमेश्वराने, सण व शब्बाथ ह्यांचा सीयोनेत विसर पाडला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाने राजा व याजक ह्यांचा धिक्कार केला आहे.


मी इस्राएल वंशजांची प्रेते त्यांच्या मूर्तींपुढे टाकीन, तुमच्या वेद्यांभोवती तुमची हाडे विखरीन.


मी तुम्हांला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल; तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवतील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल.


तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की, उडणार्‍या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील; तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीस लागले नसताही ते पळतील.


मग छावणीतील व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरकाप झाला; ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हेही थरथरा कापू लागले; भूमीही कंपायमान झाली; ह्या प्रकारे प्रचंड कंप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan