Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 53:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, जर तेथे कोणी समजदार आहे, आणि जो देवाचा शोध घेतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मानवांमध्ये कोणी समंजस आहे का परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 53:2
14 Iomraidhean Croise  

हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.


तो आसाच्या भेटीस जाऊन त्याला म्हणाला, “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते ऐका; तुम्ही परमेश्वराच्याबरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हांला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हांला सोडील.


तथापि तुझ्या ठायी काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत; तू देशातून अशेरा मूर्तींचा नाश केला आहेस व आपले मन देवाच्या भजनी लावले आहेस.” यहोशाफाट न्यायाधीशांची नेमणूक करतो


तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”’


दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात.


कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानावरून खाली पाहिले; त्याने आकाशातून पृथ्वीकडे पाहून


परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे; त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात.


परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्वकाळ चालते.


“माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, “हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.”


परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा;


कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गांवर आहेत; ते मला गुप्त नाहीत; त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यांपासून लपलेले नाही.


परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.


तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत; कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल; त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की, ‘हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan