Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 53:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही.” लोक दुष्ट व अमंगळ कृत्ये करतात; सत्कृत्य करणारा कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही. ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे; त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर अस्तित्वात नाही.” ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी, कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 53:1
24 Iomraidhean Croise  

यराबाम आपल्या मनात म्हणाला की, “हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे.


आणि त्या देशात पुरुषगामीही होते; ज्या सर्व राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएलासमोरून हाकून दिले होते त्यांच्या अमंगळ कर्मांप्रमाणे हे करू लागले.


अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही.


तर जो पाण्यासारखे पातकाचे प्राशन करतो, असल्या अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा!


तो आपल्या मनात म्हणतो की, “देवाला विसर पडला आहे, त्याने आपले तोंड लपवले आहे, तो हे कधीच पाहणार नाही.”


देवाला दुर्जन का तुच्छ मानतो? “तू झडती घेणार नाहीस” असे तो आपल्या मनात का म्हणतो?


दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात.


तो आपल्या मनात म्हणतो की, “मी ढळणार नाही, मी पिढ्यानपिढ्याही विपत्तीत पडणार नाही.”


हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करतो;


पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की,


तू त्यांच्या मार्गांनी व त्यांच्या अमंगळ कृत्यांप्रमाणे थोडीथोडकी चाललीस असे नाही, तर तू आपला सर्व आचार त्यांच्यापेक्षाही भ्रष्ट केलास.


शोमरोनेने तर तुझ्याहून अर्धेसुद्धा पाप केले नाही. तू आपली अमंगळ कृत्ये त्यांच्याहून अधिक केलीस; तू केलेल्या अमंगळ कृत्यांच्या मानाने तुझ्या बहिणी निर्दोष ठरल्या.


मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.


परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’


देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणेदेखील लज्जास्पद आहे.


आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नकोस; कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत; ते देवांप्रीत्यर्थ आपल्या मुलामुलींचादेखील होम करीत असतात.


कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan