Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 51:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 51:1
31 Iomraidhean Croise  

संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राज-मंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला; तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली; ती स्त्री दिसायला फार सुंदर होती.


त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको, त्यांची पातके तुझ्यापुढून पुसून जाऊ नयेत, कारण त्यांनी कोट बांधणार्‍यांसमोर तुला संताप आणला आहे.


त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करून आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली.


आमच्या पूर्वजांनी मिसर देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले.


हे परमेश्वरा, हे प्रभू, तू आपल्या नावासाठी मला वागवून घे; तुझी दया उत्तम आहे म्हणून तू मला सोडव.


तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे, आणि तू आपले नियम मला शिकव.


परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.


हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करतो तेव्हा माझे ऐक; मला तू पेचांतून मोकळे केले आहेस; माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक.


हे परमेश्वरा, तू माझ्याविषयीचा आपला कळवळा आवरून धरू नकोस; तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत.


मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन; तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन.


माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक.


मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.


हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे; आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ.


देव कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय?” (सेला)


मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही.


तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे.


तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पाहा; तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे.


परमेश्वराने आमच्यावर जे सर्व उपकार केले आणि आपल्या दयेने व आपल्या विपुल करुणेने इस्राएलाच्या घराण्याचे जे फार कल्याण केले, त्यांस अनुसरून असे परमेश्वराच्या सदय कृत्यांचे मी वर्णन करीन, त्याचे गुणानुवाद गाईन.


हे परमेश्वरा, मला मारण्याचे त्यांचे सर्व मनसुबे तू जाणतोसच; त्यांच्या दुष्कर्माची क्षमा करू नकोस, आपल्या दृष्टीपुढून त्यांचे पातक पुसून टाकू नकोस; म्हणजे ते तुझ्यापुढे ठोकर खाऊन पडतील; तुझ्या क्रोधसमयी त्यांची अशी वाट लाव.


तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो.


हे माझ्या देवा, कान दे, ऐक; आपले नेत्र उघडून आमचा झालेला विध्वंस पाहा व तुझे नाम ज्या नगरास दिले आहे ते पाहा; आम्ही आपल्या विनवण्या आमच्या नीतिमत्तेस्तव नव्हे, तर तुझ्या विपुल करुणांस्तव तुझ्यापुढे मांडतो.


आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली


तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावेत;


आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan