Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्यांच्या तोंडाचा भरवसा नाही; त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे; त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे; ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण त्यांच्या मुखात काही सत्य नाही, त्यांचे अंतर्याम दुष्टपणच आहे. त्यांचा गळा उघडे थडगे आहे, ते आपल्या जीभेने आर्जव करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यांच्या मुखातून निघालेल्या एकाही शब्दावर विश्वास ठेऊ शकत नाही; त्यांचे हृदय द्वेषाने भरलेले आहे. त्यांचे कंठ उघड्या कबरेप्रमाणे आहे; त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 5:9
25 Iomraidhean Croise  

मग मी अहवा नदीतीरी उपास करण्याचे जाहीर केले; त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे.


हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव; लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने.


पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे.


अरे कपट करणार्‍या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी अनर्थाची योजना करते.


त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात; त्यांना लबाडी आवडते; ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. (सेला)


मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत.


ते कुटिल युक्त्या शोधून काढतात; ते म्हणतात, “आपण चतुराईने युक्ती शोधून काढली आहे;” प्रत्येकाचे अंतर्याम व हृदय खोल आहे,


माझी निंदा, माझी फजिती आणि माझी अप्रतिष्ठा तू जाणतोस; माझे सर्व शत्रू तुझ्यापुढे आहेत.


जो आपल्या शेजार्‍याची खुशामत करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरतो.


नीतिमानाचा मार्ग नीट आहे; तू न्यायपरायण असून नीतिमानाची गती सरळ करतोस.


हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?


हे यरुशलेमे, तू आपल्या अंत:करणाची दुष्टता धुऊन टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर वसणार?


तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत, तेथील रहिवासी खोटे बोलतात; त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपटरूप आहे;


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परूशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता; पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे.


अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणार्‍या कबरांसारखे आहात, त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात.”


“त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे; त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे.”


कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे; तसेच लोभाने कपटवेष धारण करत नव्हतो, देव साक्षी आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan