Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने, आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव, तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा, माझ्या शत्रूंमुळे— माझ्यासमोर तुमचा सरळ मार्ग मला दाखवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 5:8
16 Iomraidhean Croise  

तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिले आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.”


अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.


हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तू आपले नियम मला शिकव.


तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन, तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करीन; कारण तू आपल्या संपूर्ण नावांहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस.


हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव; लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने.


हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस; तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर,


माझ्यावर टपून बसणार्‍यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यांना देईल; तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर.


माझा प्रेमळ देव मला भेटेल; देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील.


हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.


तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.


जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहोकडून मला घेरले; समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले.


त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली की : परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा; त्याच्या वाटा नीट करा.”


आणि ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा,’ ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan