Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन; तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन, मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परंतु तुमच्या महान प्रीतीद्वारे, मी तुमच्या भवनात येईन; अत्यंत आदराने तुमच्या पवित्र मंदिरात तुम्हाला नमन करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 5:7
27 Iomraidhean Croise  

त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली आणि पर्जन्यवृष्टी खुंटली असता त्यांनी ह्या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यांना दीन केल्यामुळे ते तुझ्याकडे वळले,


आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील,


कपट करणार्‍याला माझ्या घरात थारा मिळणार नाही; असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही.


तरीपण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.


“आपण त्याच्या निवासमंडपात जाऊ; त्याच्या पदासनापुढे दंडवत घालू.”


तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन, तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करीन; कारण तू आपल्या संपूर्ण नावांहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस.


मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभार्‍याकडे हात वर करतो; तेव्हा माझी दीन वाणी ऐक.


नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो.


हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.


मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे.


मी तर देवाचा धावा करीन, आणि परमेश्वर मला तारील.


मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.


हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे; आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ.


परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे :


उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात,


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


आमचे पूर्वज ज्या आमच्या पवित्र व सुशोभित मंदिरात तुला स्तवीत, ते अग्नीचे भक्ष्य झाले आहे, आणि आमच्या सगळ्या मनोरम वस्तू नष्ट झाल्या आहेत.


ह्या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला.


अशा प्रकारे सर्व यहूदीया, गालील व शोमरोन ह्या प्रदेशांतील मंडळीस स्वस्थता मिळाली, आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.


तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan