Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 5:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 असत्य भाषण करणार्‍याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस; परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 खोटे बोलणाऱ्यांचा तुम्ही त्यांना नाश करता. खुनी आणि कपटींचा याहवेहला तिरस्कार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 5:6
13 Iomraidhean Croise  

ते त्यांना म्हणाले, “बेसुनत माणसाला आमची बहीण देणे हे आमच्या हातून होणार नाही, आम्हांला बट्टा लागेल.


ज्या शौलाच्या जागी तू राज्य केलेस त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे, आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम ह्याच्या हाती राज्य दिले आहे; तू रक्तपात करणारा माणूस आहेस, ह्यास्तव तुझ्या दुष्टतेतच तू गुरफटला आहेस,”


बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


परमेश्वर नीतिमानाला कसास लावतो; त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो.


अहो मनुष्यांनो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हांला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार आणि तुम्ही लबाडीची कास कोठवर धरणार? (सेला)


हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.


हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.


कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रकट करील, वधलेल्यांना ती ह्यापुढे झाकून ठेवणार नाही.


सर्व प्रकारची अनीती, जारकर्म, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले होते.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan