Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस; सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन, आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील, सकाळी मी माझी विनंती तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता; सकाळी मी माझ्या प्रार्थना तुम्हाला सादर करतो व अपेक्षेने तुमची वाट पाहतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 5:3
15 Iomraidhean Croise  

त्यांच्या करणीमुळे कंगालांचा आक्रोश त्याच्यापर्यंत गेला; दीनांची आरोळी त्याच्या कानी गेली.


उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो.


हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.


पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा, पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.


हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.


माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही.


आम्ही तुझ्या साहाय्याने आपल्या शत्रूंना उलथून टाकू; आमच्यावर उठणार्‍यांना तुझ्या नावाने पायदळी तुडवू.


संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकळुतीने आपले गार्‍हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल.


हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे; आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ.


तरी देव पुरातन कालापासून माझा राजा आहे; पृथ्वीवर उद्धार करणारा तो आहे.


तुझ्या घरात राहणार्‍यांची केवढी धन्यता! ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. (सेला)


मी तर, हे परमेश्वरा, तुझा धावा करतो; प्रातःकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.


रात्री माझ्या जिवास तुझी उत्कंठा लागली; मी अगदी अंत:करणपूर्वक तुझा शोध करीन; कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे नीतिमत्ता शिकतात.


तू माझी वाणी ऐकलीस; माझ्या उसाशाला; माझ्या आरोळीला, आपला कान बंद करू नकोस.


मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan