Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत; त्यांचे तू रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करोत; ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठायी उल्लास पावोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करोत. ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्यामध्ये आनंद करोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु जे सर्व तुमच्याठायी आश्रय घेतात ते आनंदित होवोत; त्यांना सदैव हर्षगीते गाऊ द्या. तुम्ही त्यांचे रक्षण करता, ज्यांना तुमचे नाव प्रिय आहे, त्यांनी तुमच्यामध्ये आनंद करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 5:11
18 Iomraidhean Croise  

त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले. व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.


पुत्राने2 रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.


माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणार्‍या परमेश्वराचा गौरव होवो, असे ते सतत म्हणोत.


तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद व उल्लास पावोत; तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे “परमेश्वराचा महिमा वाढो,” असे सतत म्हणोत.


सूड घेतलेला पाहून नीतिमान हर्ष पावेल; दुष्टांच्या रक्तात तो आपले पाय धुईल,


कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत; खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत; ती मोठ्याने जयजयकार करतात व गातात.


परंतु नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, हर्षामुळे आनंद करोत.


ते त्यांच्या दासांच्या संततीचेही वतन होईल; ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करतील.


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.


हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, “डोळ्यानहले नाही, कानाने जे ऐकले ने नाही व माणसाच्या ‘मनात जे अले नाही, ते आपणावर प्रीत करणार्‍यांसाठी देवाने सिद्ध केल आहे;”


जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.


माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?


‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’


हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणार्‍या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan