Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 हे देवा, त्यांना दोषी ठरव; ते आपल्या मसलतींत फसोत; त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे, कारण ते तुला जुमानत नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 देवा, त्यांना अपराधी घोषीत कर, त्यांच्याच योजना त्यांना पडण्यास कारणीभूत ठरो. तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल घालवून दे. कारण त्यांनी तुझ्याविरूद्ध बंड केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परमेश्वर, त्यांना दोषी घोषित करा! त्यांच्या कारस्थानामुळेच त्यांचे पतन होवो. त्यांच्या अनेक अपराधांमुळे त्यांना तुमच्यापासून दूर घालवून द्या, कारण त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 5:10
41 Iomraidhean Croise  

कोणी दाविदाला सांगितले की, “अहिथोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे.” हे ऐकून दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, अहीथोफेलाची मसलत फोल कर.”


अबशालोम व सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहीथोफेल ह्याच्या मसलतीपेक्षा हूशय अर्की ह्याची मसलत बरी दिसते.” अहीथोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती.


आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले.


तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प राहा; तुला मार पाहिजे काय?” तेव्हा संदेष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, “मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरवले आहे, कारण तू हे असे केले आहेस व माझा सल्ला घेतला नाहीस.”


तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.


दुर्जनाचा बाहू मोडून टाक; दुष्टाचे दुष्कर्म निःशेष होईपर्यंत त्याचा पिच्छा पुरव.


कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानला होता.


हे परमेश्वरा, ऊठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चीत कर; आपल्या तलवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडव.


नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणार्‍यांची वाचा बंद पडो.


माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.


त्यांना अकस्मात मरण येवो; ते जिवंतच अधोलोकी उतरोत; त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे.


तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ सत्ता चालवतो, त्याचे नेत्र राष्ट्रांना निरखून पाहतात; बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. (सेला)


माझ्या जिवाला अपाय करणारे लज्जित होऊन नष्ट होवोत; माझे अनिष्ट करू पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप्त होवोत.


हे प्रभू, आमच्या शेजार्‍यांनी केलेली तुझी निंदा उलट त्यांच्या पदरी सातपटीने घाल.


हे आकाशा, ऐक; अगे पृथ्वी, कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे : “मी मुलांचे पालनपोषण केले, त्यांना लहानाचे मोठे केले तरी ती माझ्याशी फितूर झाली.


तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”


तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले; तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला, तो स्वत: त्यांच्याशी लढला.


तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे; तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत; कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे; वैर्‍यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत.


आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले; फितुरी झालो, तुझे विधी व तुझे निर्णय ह्यांपासून आम्ही परावृत्त झालो.


आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली


समाचार घेण्याचे दिवस आले आहेत; प्रतिफळाचे दिवस आले आहेत; इस्राएलास हे समजून येईल; तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.


कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे; कारण “तो ज्ञान्यांस त्यांच्याच धूर्तपणात धरतो,” असा शास्त्रलेख आहे.


पण हेशबोनाचा राजा सीहोन आम्हांला त्याच्या देशातून जाऊ देईना; कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याला तुमच्या हाती द्यावे म्हणून त्याची वृत्ती कठोर केली व त्याचे मन कठीण केले; आज तो देश तुमच्या हाती आहे.


एक मनुष्य आपला पाठलाग करायला व आपला प्राण घ्यायला उठला आहे, तरी माझ्या स्वामींचा प्राण आपला देव परमेश्वर ह्याच्याजवळ जिवंताच्या समूहात बांधलेला राहील, आणि आपल्या शत्रूंचे प्राण तो जसे काय गोफणीत घालून गोफणून टाकील.


नाबालाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून दावीद म्हणाला, “नाबालाच्या हातून माझी अप्रतिष्ठा झाली तिची दाद ज्याने घेतली आणि आपल्या दासाला घात करण्यापासून आवरले, तो परमेश्वर धन्य! परमेश्वराने नाबालाचे दुष्कर्म त्याच्याच शिरी उलटवले.” मग दाविदाने अबीगईलेशी लग्नाचे बोलणे करण्यासाठी तिच्याकडे लोक पाठवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan